Nashik : गैरव्यवहार झाल्याची भीती दाखवून वृद्धाला सव्वासात लाखांचा गंडा
Nashik : गैरव्यवहार झाल्याची भीती दाखवून वृद्धाला सव्वासात लाखांचा गंडा
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बँक खात्यातून 6.8 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची भीती दाखवून सायबर भामट्याने एका वृद्धाला 7 लाख 37 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकांत गजेंद्र शिंदे (वय 61, रा. नीलकंठ पार्क, पंडित कॉलनी, नाशिक) हे दि. 21 मार्च 2024 रोजी आपल्या घरात होते. त्यादरम्यान शिंदे यांच्या नावे ॲक्टिव्हेट झालेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून उघडण्यात आलेल्या बँक खात्यातून 6.8 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची भीती वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून बोलणाऱ्या अनोळखी इसमाने त्यांना दाखविली.

त्यानंतर या मोबाईलवरून बोलणाऱ्या इसमाने इंड्सइंड बँकेच्या 25620855367 या खाते क्रमांकावर फिर्यादी शिंदे यांना 7 लाख 37 हजार रुपये भरावयास लावून त्यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group