धक्कादायक : दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास
धक्कादायक : दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास
img
DB
पुणे : पुण्यातून दरोड्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरांनी चक्क पोलीस स्टेशन हद्दीतील सोन्याच्या दुकानांवर दरोडा टाकला आहे. पुण्यात वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकांनावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारी, चोऱ्या अन् दरोड्याचे प्रमाण वाढत आहे. पुण्यात वानवडी पोलीस ठाणे हद्दीत ७ अनोळखी व्यक्ती मास्क लावून आले. मोहम्मद वाडी रोड वारकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्स या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकला.

यावेळी दरोडेखोरांनी ३०० ते ४०० ग्राम सोने लंपास केलं आहे. आरोपी मोटार सायकल वरून पसार झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.
पुण्यात सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला आहे. दरोडेखारांनी दिवसाढवळ्या सोन्याचं दुकान लुटलं आहे. त्यांनी लाखोंचा माल लंपास केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
Pune | crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group