पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरपुडी गावात राहणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांकडून अपहरण आल्याने १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील खेड येथील खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या दाम्पत्याने समाजातील विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. दोघेही काही काळापासून गावात स्थायिक होते. मात्र त्यांच्या या नात्याला प्राजक्ताच्या नातेवाईकांकडून विरोध होता. रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास, प्राजक्ताचे कुटुंबीय गावात आले.
हे ही वाचा !
त्यांनी आधी विश्वनाथवर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर प्राजक्ताचे अपहरण करत तिला बळजबरीने घेऊन गेले. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, मारहाण व बळजबरीच्या आरोपाखाली १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.