धक्कादायक : गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा पर्दाफाश, लाखोंचा ऐवज जप्त
धक्कादायक : गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा पर्दाफाश, लाखोंचा ऐवज जप्त
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  छत्रपती संभाजीनगर शहरात एक उच्चशिक्षीत तरूणी तिच्या फ्लॅटमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करीत होती. मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करत तिचा पर्दाफाश केला आहे. शहरातील गारखेडा भागामध्ये हे गर्भनिदान चाचणी सेंटर सुरू होते. सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरित्या गर्भनिदान करणाऱ्या केंद्रावर आरोग्य विभागाने छापा टाकला आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका रहिवाश फ्लॅटमध्ये गर्भनिदान चाचणीचा धंदा सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे इंजीनिअरिंग करणारी तरुणी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती. 

यावेळी महापालिकेच्या पथकाला 12 लाख 78 हजारांची अधिक रक्कम मिळून आली आहे. सोबतच गर्भलिंग निदान करण्याचं साहित्य देखील मिळून आलं आहे. ही कारवाई रविवारी दुपारी केली गेली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. 

महापालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॅटमध्ये गुपचूप हा गोरखधंदा सुरू होता. त्यांनी या तरूणीला रंगेहाथ पकडलं आहे. तसंच तिथून त्यांना गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरले जाणारे लॅपटॉप, टॅब, सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे स्कॅनर, कापूस, लोशन हे साहित्य मिळाले आहे. त्याचप्रमाणे मोठी रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group