महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरमधील ४०० लिटर ऑईलची चोरी
महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरमधील ४०० लिटर ऑईलची चोरी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरमधील 38 हजार रुपये किमतीचे 400 लिटर ऑईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दशरथ अमृता गावंडे (रा. ओम्‌‍कारनगर, म्हसरूळ, पंचवटी) हे महावितरणच्या मखमलाबाद कक्षाचे प्रधान तंत्रज्ञ आहेत. त्यांनी म्हटले, की मखमलाबाद कक्षातील तवली फाटा येथे महावितरणचा दोनशे केव्ही दाबाचा ट्रान्स्फॉर्मर आहे.

अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास या ट्रान्स्फॉर्मरमध्ये असलेले 38 हजार रुपये किमतीचे 400 लिटर ऑईल चोरून नेले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक बागूल करीत आहेत.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group