धक्कादायक ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पत्नीची मृतदेहाशेजारी पूजा
धक्कादायक ! पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पत्नीची मृतदेहाशेजारी पूजा
img
दैनिक भ्रमर

एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची घटना नाशिक शहरात घडली असून धक्कादायक म्हणजे पतीने गळफास घेतल्यानंतर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेहाशेजारीच पत्नी पूजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . 

 गळफास घेतलेल्या अवस्थेतील पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर मांडलेल्या पूजा साहित्याजवळ एक महिला त्या व्हिडिओत दिसत आहे. तसेच मृतदेहाच्या अंगावरही ठिकठिकाणी हळद व कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसत आहे.

सुरुवातीला  हा प्रकार जादूटोण्याचा आणि अंधश्रद्धेतून झाल्याची परिसरात चर्चा होती. परंतु पत्नी मनोरुग्ण असल्याचा नातेवाईक आणि पोलिसांनी दावा केला आहे. नवनाथ घाटवट यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेला आठवडा उलटला आहे.

नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अधिक तपास केला. त्यांनी हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला नसल्याचं म्हटलंय. मानसिक आणि कौटुंबिक वादातून पतीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबत मिळालेली माहिती अशी की,  जेलरोड भागात ११ सप्टेंबरला रात्री साडे आठच्या सुमारास नवनाथ भगवंत घायवट यांनी स्वयंपाक घरात गळफास घेतला होता. या घटनेची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. आता या घटनेच्या आठवड्याभराने गळफास घेतलेला व्हिडीओ व्हायरल झालाय.

पतीचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत असताना शेजारीच पत्नी पूजाविधी करत असल्याने याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. नवनाथ घायवट यांची पत्नी मानसिक रुग्ण आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचारसुद्धा सुरू आहेत. नवनाथ घायवाट यांचे पत्नीसोबत वाद झाल्याचंही सांगण्यात येतंय. घायवाट यांचं किराणा मालाचं दुकान असून त्यांची मुलं शिकण्यासाठी पुण्याला असतात. पत्नी सतत घर सोडून जायची. ती वेडसर असल्यानं वादानंतर पतीने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group