
२३ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकचा धडाकेबाज फलंदाज साहिल पारखने १९ वर्षाआतील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करीत शानदार शतक झळकवले. साहिल पारखच्या या आंतरराष्ट्रीय सामन्यातील शतकामुळे नाशिकमध्ये जल्लोष केला जात आहे.
पॉण्डेचेरी येथे सुरू असलेल्या १९ वर्षातील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळविण्यात आला. या सामन्यात नाशिकच्या साहिल पारखने अवघ्या ७५ चेंडूत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या सहाय्याने नाबाद १०९ धावांची खेळी केली.
भारताने हा सामना २२ व्या षटकातच जिंकला. यामुळे भारतीय संघाने हा सामना ९ गडी राखून जिंकत मालिका २-० अशी जिंकली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने ४९.३ षटकात १७६ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून अॅडिसन शिरीफ याने सर्वाधिक २८ धावा केल्या. भारताकडून समर्थ एन., मोहम्मद एनान आणि किरण चोरमले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा डाव लवकर गुंडाळला गेला.
Copyright ©2025 Bhramar