नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, ड्रोन उडला अन.. पुढे काय झाले ?
नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, ड्रोन उडला अन.. पुढे काय झाले ?
img
दैनिक भ्रमर
नाशिक जिल्हा पर्यटनाचे आकर्षण असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. दरम्यान, नाशिक येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकांच्या समूहावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे .नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाजवळ शितकडा धबधब्यावर रॅपलिंगसाठी गेलेल्या पर्यटकांच्या समूहावर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेत काही पर्यटक जखमी झाले आहे. या हल्ल्यामध्ये एकूण 20 ते 25 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, इगतपूरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम जंगलामध्ये 350 फूट उंचीचा शितकडा धबधबा आहे. कल्याणमधील एका संस्थेच्या माध्यमातून या धबधब्यावर मागील तीन महिन्यांपासून साहसी खेळांचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका गटाला घेऊन आयोजक रविवारी या धबधब्यावर पोहोचले होते. कल्याण, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील काही लोकांचा समावेश असलेला गिर्यारोहकांचा हा गट रविवारी दुपारपर्यंत शितकडा धबधबा परिसरामध्ये साहसी खेळांच्या उद्देशाने पोहोचले. धबधब्यावरुन वॉटरफॉल रॅपलिंग करण्याची तयारी सुरु असतानाच या ठिकाणाच्या निरिक्षणासाठी आयोजकांकडून ड्रोन उडवण्यात आल्याने मधमाशांचे एक मोठे मोहोळ उठले आणि या मधमाशांनी या गटावर हल्ला केला. 

रॅपलिंगसाठी आलेल्या या ग्रुपमध्ये ५० पेक्षा अधिक पर्यटक होते. यात लहान मुले आणि महिला देखील होत्या. दुपारीच्या सुमारास हे सर्व जण धबधब्या मुखाजवळ पोहोचले. यावेळी ड्रोन उडवल्याने मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. अचानक मधमाशा चावू लागल्याने मोठा गोंधळ उडाला. पर्यटक एकमेकांना शांत आणि जमिनीवर झोपण्यास सांगत होते. मात्र, मधमाशा चावत असल्याने काही जण पळत सुटले होते.

दरम्यान , या ग्रुपचे प्रशिक्षक जयस्वार यांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना डंख केल्याने ते देखील या घटनेत जखमी झाले
इतर बातम्या
Join Whatsapp Group