75 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी माजी सरपंचाविरुद्घ गुन्हा
75 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी माजी सरपंचाविरुद्घ गुन्हा
img
दैनिक भ्रमर
नाशिक : हॉटेल सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखल देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल दौलत तांबे, (वय-३६) असे लाच मागणाऱ्या माजी सरपंचाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी गोंदे ता. सिन्नर जिल्हा नाशिक येथे हॉटेल परमिट रूम व बियरबार व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यासाठी गोंदे ग्रामपंचायतीची ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी गोंदे चे ग्रामपंचायत कार्यालय येथे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज केला होता.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदे चे तत्कालीन सरपंच अनिल दौलत तांबे यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवक भणगीर यांचे नवाने ७५००० रूपये लाचेची मागणी करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशांच्या स्वरूपात लाभ मिळविण्यासाठी व्यवस्था करून लाचेची मागणी केली. म्हणून अनिल दौलत तांबे, माजी सरपंच, गोंदे ता. सिन्नर यांचे विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भ्र.प्र.अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.हवा. सुनील पवार यांनी केली.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group