नाशिक( भ्रमर प्रतिनिधी) : अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना अंबड गाव बस स्टोपजवळ भाजी मार्केट जवळ काही आरोपी गांजा विक्री गोपनीय माहिती मिळाली, याप्रकरणी संदीप उर्फ राजाराम महाले ( वय २४, रा. अंबडगाव ) व सुखदेव गंगाधर जाधव ( वय ३३, रा. जाधव संकुल अंबड लिंक रोड) यांना ताब्यात घेण्यात आले, त्याच्या रिक्षा क्रमांक एम एच १५ जे ए १६८६ सुमारे २५ हजार किंमतीचा २ किलो ५३३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.दोन्ही आरोपींना पुढील तापासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी संदीप उर्फ बाळा महाले हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध या पूर्वीही गुन्हे दाखल आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, संदीप मिटके, सहा. पो. आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वपोनी सुशिला कोल्हे, सपोनी. विशाल पाटील, सपोउनी. देवकिसन गायकर, सपोउपनि रंजना बेंडाळे, संजय ताजणे, हवालदार. भारत डबांळे, बळवंत कोल्हे, नांद्रे, येवले, सानप, बागडे, फुलपागरे, महिला पोलीस हवालदार अर्चना भड आदी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कामगिरी केली.