बागड प्रॉपर्टीचे संचालक चंद्रकांत बागड यांचे निधन
बागड प्रॉपर्टीचे संचालक चंद्रकांत बागड यांचे निधन
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील बागड प्रॉपर्टीज् व बागड असोसिएट्सचे संचालक चंद्रकांत रामचंद्र बागड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते 75 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्‍चात मुलगा अजिंक्य, बंधू राजेंद्र बागड, विलास बागड, दीपक बागड, अनुपकुमार बागड, मुली व जावई दीपक पाटे (खारघर), अविनाश लोखंडे (धुळे) व सचिन मुसळे (न्यूजर्सी) असा परिवार आहे.

आज दुपारी 4 वाजता जय योगेश्‍वर बंगला, अद्वैत कॉलनी, विसे मळा येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्यावर द्वारका, अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बागड परिवाराच्या दु:खात भ्रमर परिवार सहभागी आहे.

इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group