Nashik : प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक करणार्‍या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी
Nashik : प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक करणार्‍या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी असलेल्या रिक्षाला पाठीमागून भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत रिक्षातील तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना पंचवटीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मिनाली सुदर्शन राठोड (रा. आडगाव शिवार, नाशिक) व त्यांचे वडील पूनमचंद उखा चव्हाण असे रविवार कारंजा येथून म्हसरूळकडे जाण्यासाठी एमएच 15 एफयू 1297 या क्रमांकाच्या रिक्षाने प्रवास करीत होते. ही रिक्षा दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटलसमोर आली असता पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच 19 सीवाय 8634 या क्रमांकाच्या पिकअप वाहनावरील चालकाने रिक्षाला धडक दिली.

त्यात प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी असलेली रिक्षा पलटी झाली. त्यात फिर्यादी राठोड, त्यांचे वडील पूनमचंद चव्हाण व इतर दोन महिला प्रवाशांना दुखापत झाली असून, वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पिकअपचालक व रिक्षाचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडला होता. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group