फसवणूक प्रकरणी सतीश काळेचा ताबा लासलगाव पोलिसांनी घेतला
फसवणूक प्रकरणी सतीश काळेचा ताबा लासलगाव पोलिसांनी घेतला
img
दैनिक भ्रमर
लासलगाव :  स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या  कंपनीचे फसवणूक प्रकरणी सतीश काळेचां लासलगाव पोलिसांना ताबा दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी दिली. मंगळवार आणि बुधवारी लासलगाव पोलीस कार्यालयात निफाडचे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश पालवे लासलगाव पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे आणि सविस्तरपणे जाब जबाब नोंदविलेली आहे.

 काही एजंट व कर्मचारी यांची सखोल चौकशी केली. आज मंगळवारी सात ते आठ तक्रारदारांनी लासलगाव पोलीस कार्यालयात आपली फसवणूक झाल्याचे सांगितले मात्र लेखी फिर्याद कोणीही दिली नाही मात्र ते या फिर्यादित साक्षीदार होण्यास तयार आहेत. असे डॉ. पालवे यांनी पत्रकारांना सांगितले. आज सतीश काळे यांचा ताबा घेतल्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे पथकाने सतीश काळेच्या टाकळी विंचूर येथील श्रीराम फायनान्सचे सील तोडून ते मागील दाराने ये जा सुरू होती त्याच्या निवासस्थानी पंचनामा करण्यात आला. डी.व्ही  आर. जप्त करण्यात आला आहे आणि झडती घेण्यात आली. व्यवस्थापक अनिता शिंदे यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार यंत्रणा कामाला लावलेली आहे.सर्व कर्मचारी यांची चोकशी करण्यात आली. बँक खाते पोलिसांनी गोठवली आहेत.तसेच बँक व्यवहाराचे चेक देण्यात आले त्याची माहिती पोलीस घेत आहेत.तसेच आरोपी योगेश काळे याचे कडे पासपोर्ट असल्याने लुक आऊट कॉर्नर जारी करण्यात आली आहे असे उप अधीक्षक डॉ.निलेश पालवे यांनी दिली.

लासलगाव पोलिसांनी दाखल केलेल्या सुमारे 50 लाख 86 हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी  दुसरा संशयित दुसरा आरोपी योगेश काळे याच्या शोधासाठी विविध प्रकारच्या यंत्रणा कार्यरत असून पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करीत आहेत व लवकर योगेश काळे यास  ताब्यात घेण्यात  यश प्राप्त होईल असे निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी एजंट व गुंतवणूकदार यांना बोलावून सुमारे 35 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे पोलीस सर्व कागदपत्राची छाननी करीत आहे. लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस स्टेशन अभ्यास करायचा आहे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलिस अधिकारी पोलीस कार्यालयात ठान  मांडून आहेत.
नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता पोलीस यंत्रणेच संपर्क साधून

    कोट........आपल्या गुंतवणूक विषयी माहिती द्यावी व कागदपत्रे द्यावी तसेच जे निश्चित दोष असतील त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतील पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे घाबरून न जाता आपल्याकडील गुंतवणूक बाबत जी माहिती दिली जाईल ती गोपनीय स्वरूपाची ठेवण्यात येईल असे आवाहन डिपार्टचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी केले आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group