10 हजारांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास अटक
10 हजारांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास अटक
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- 10 हजारांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

राजेंद्र भागवत केदारे (वय 57), विभागीय तांत्रिक अधिकारी (वर्ग-2), विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक उपविभाग, नाशिक असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाची पत्नी ह्या  महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहे. त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक  यांचे मार्फतीने स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अपील सुरू होते.

या अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागल्याने या अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता केदारे यांनी 15000 रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती त्यांनी 10000/- रुपये स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस  स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो.ना.विलास निकम, चालक पो.हवा.संतोष गांगुर्डे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group