तोतया पोलीस व महसूल अधिकाऱ्याच्या आवळल्या मुसक्या; घरात सापडल्या
तोतया पोलीस व महसूल अधिकाऱ्याच्या आवळल्या मुसक्या; घरात सापडल्या "या" वस्तू
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- पोलीस किंवा महसूल खात्याचा अधिकारी नसताना लोकांमध्ये अधिकारी असल्याचा समज व्हावा या उद्देशाने भारतीय पोलीस आणि महसूल सेवेतील अधिकारी वापरतात तसे गणवेश आणि त्यावरील ओळख चिन्हे बाळगणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 चे हवालदार संजय सानप यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाथर्डी फाटा परिसरातील हरीविश्व सोसायटी मधील फ्लॅट नंबर 1002 मध्ये गौरव रामाअछेबर मिश्रा (वय 34) हा राहतो.

सदर इसम पोलीस अधिकारी व महसुल अधिकारी नसताना तसे लोकांना भासवतो अशी माहिती मिळाल्याने काल दुपारी 1.49 वाजता त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.

त्यावेळी पुढील साहित्य त्याच्या घरात आढळले :
खाकी शर्ट, शिट्टी, त्यावर 3750 नंबर लिहिलेला होता, स्टारच्या बाहेरील बाजूस भारतीय रेव्हेन्यू सर्व्हिसचा लोगो लावलेला आहे, चांबडी बेल्ट व राजमुद्रा असलेली पॅन्ट, पोलीस दलात वापरली जाणारी पॅन्ट, IPS अधिकारी वापरणारे पोलीस कॅप ज्यावर राज मुद्रा व आयपीएस असा सिम्बॉल आहे, ips अधिकारी वापरणारा ब्लेझर, ias आणि ips याचे बॅचेस, मपोसे चे 2 बॅचेस, ips चे 3 लोगो, पोलीस गणवेशातील तलवार, महाराष्ट्र शासन व वन विभाग नाव असलेली कॅप, पोलिसांचे इतर बॅचेस, तांबड्या रंगाचे बूट, राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी चे 2 कप, पोलीस वाहनावरील अंबर रंगाचा दिवा, लाल व निळ्या रंगाचा दिवा, पोलीस अधिकाऱ्याचे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र, परिवहन उपयुक्त नावाचे लेटर हेड, 2 वॉकी टॉकी, 1 लाखाचा अँपल फोन, 80 हजारांचा सॅमसंग एस 22 अल्ट्रा मोबाइल, 4 सिमकार्ड असा मुद्देमाल मिळून आला.

त्याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group