आजकाल गुन्हेगारी मध्ये वाढ तर झालीच आहे पण शिक्षित लोकांच्या विकृत बुद्धिनेही कळस गाठल्याचे दिसतेय . आई वडील स्वतः नंतर आपल्या पाल्या साठी दुसरं कोणावर विश्वास ठेवत असतील तर ते असतात शिक्षक, पण जर शिक्षकांनीच मुलांसोंबत गैरवर्तन ऐकले तर ? अशीच एक संतापजनक घटना समोर आलीय . या घटनेत अक्षरशः शिक्षिकेनेच लहान मुलीच्या डोक्यात टोकदार पेनाने घाव केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
शिक्षिकेनेच 5 वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात धारदार पेनाचे घाव घातल्याचा संतापजनक प्रकार रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये घडला आहे. उरणच्या जासईमध्ये ही घटना घडली आहे. मुलीच्या डोक्यात रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून शिक्षिकेने मुलीचे केसही धुतले. मुलीला अमानुष मारहाण केल्याच्या तीन दिवसानंतरही ही शिक्षका मोकाट आहे.
उरणच्या जासईमध्ये घरगुती शिकवणी घेणाऱ्या एका विकृत शिक्षेकेचं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. नीता प्रकाश म्हात्रे असं या शिक्षिकेचं नाव आहे. शिकवणीला येणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर या शिक्षिकेने अमानुष अत्याचार केले आहेत. पालकांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्या मुलीला शिकवणीसाठी पाठवलं, पण शिक्षिकेने मुलीच्या डोक्यात पेन टोचून तिला रक्तबंबाळ केलं. शिक्षिकेने आपला गळा आवळला आणि आपल्याला मारहाण केली, असंही या मुलीने सांगितलं आहे. शिकवणीला येणाऱ्या इतर मुलांनीही त्यांच्या घरी घडलेला प्रकार सांगितला.
या विषयी अधिक माहिती अशी की, मुलीच्या डोक्यात पेन टोचल्याचं आणि डोक्यातून रक्त आल्याचं तिच्या घरच्यांना दिसू नये म्हणून शिक्षिकेने या मुलीचे केसही धुतले, तसंच घडलेला प्रकार आई-बाबांना सांगायचा नाही, अशी जबर धमकी दिली. मुलीचे केस ओले असल्याने आईने मुलीकडे चौकशी केली तेव्हा शिक्षिकेने क्रुरपणे मारल्याचं मुलीने आईला सांगितलं. यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण अजूनही शिक्षिकेला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही.