Nashik Crime : पंडित कॉलनीत सकाळी युवकावर प्राणघातक हल्ला
Nashik Crime : पंडित कॉलनीत सकाळी युवकावर प्राणघातक हल्ला
img
सुधीर कुलकर्णी

नाशिक (सुधीर कुलकर्णी) :- शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीत आज सकाळी युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आकाश धनवटे हा युवक आज सकाळी मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत जात असताना अथर्व दाते व त्याच्या तीन साथीदारांनी आकाश धनवटेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आकाशला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. आकाश धनवटे व अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी आकाशने अथर्ववर हल्ला केला होता. त्याचा गुन्हा पण दाखल आहे. या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश हा वॉटरग्रेस मध्ये स्वीपरचे काम करतो.

आज सकाळी तो कामावर असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना केल्याचे समजते.

धनवटे याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group