भद्रकाली पोलीस ठाण्याचा हवालदार निलंबित,
भद्रकाली पोलीस ठाण्याचा हवालदार निलंबित, "हे" आहे कारण
img
दैनिक भ्रमर

 नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काढले आहेत. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की संतोष बालाजी गंजी (वय 53, रा. सोलापूर) हे दि. 29 सप्टेंबर रोजी कामानिमित्त नाशिकमध्ये आले होते. शालिमार परिसरातून त्यांची बॅग चोरीला गेल्याने ते तक्रार देण्यासाठी भद्रकली पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात असलेले पोलीस हवालदार योगेश ढमाले यांना सांगितले, की “तुम्ही शालिमारला जा. तेथे आमचे कर्मचारी येतील,” त्यानुसार गंजी हे शालिमारला गेले; मात्र दोन तास वाट पाहूनही कोणीच पोलीस कर्मचारी तेथे न आल्याने ते पुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात गेले.

ढमाले यांना भेटत आपण दोन तासांपासून शालिमार येथे उभे असून, एकही पोलीस न आल्याचे सांगितले. असे सांगताच ढमाले यांनी त्यांना कानशिलात लगावत “तुझी बॅग काही सापडणार नाही,” असे सांगितले. या घटनेने संतप्त झाल्यामुळे गंजी यांनी पोलीस आयुक्तालय गाठले. तेथे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी गंजी यांनी आपबिती ऐकून घेत चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान तक्रारदाराला चांगली वागणूक न देत, तसेच तक्रार घेण्याऐवजी त्याच्याशी उर्मटपणे वर्तन केल्याचा आक्षेप चौकशी समितीने ठेवला. या अहवालावर पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाई करीत योगेश ढमाले याला निलंबित करण्याचे आदेश दिले.

इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group