११ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दसरा सणानिमित्त आज (दि. 12) दरवर्षीप्रमाणे चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने रामकुंडाजवळ रावणदहनाचा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी रामलक्ष्मण सेनेची मिरवणूक सायंकाळी 6 वाजता चतु:संप्रदाय आखाड्यातून सुरू होईल. ही मिरवणूक मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा रोडने काळाराम मंदिर रोडने सरदार चौक, साईबाबा मंदिर ते रामकुंड पार्किंग मैदान अशी मिरवणूक निघणार आहे. शहरातील अनेक नवरात्र मंडळे ही गोदापात्रात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतात. यामुळे रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आज दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत काही रस्त्यांवर सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंड व सरदार चौक ते गाडगे महाराज पूल, तसेच गाडगे महाराज पूल ते सरदार चौक आणि रामकुंडाकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणार्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहील.
असे आहेत पर्यायी मार्ग या प्रवेशबंदीमुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे. त्यानुसार पंचवटीत गणेशवाडी, काट्या मारुती पोलीस चौकी, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा येथे येऊन इतरत्र वाहनचालक जाऊ शकतील.
Copyright ©2024 Bhramar