ठरलं...! यंदा
ठरलं...! यंदा "या" ठिकाणी होणार ठाकरे गटाचा दसरा मेळावा ; उद्धव ठाकरेंनी केली घोषणा
img
Dipali Ghadwaje
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचा मेळावा यंदा  बीकेसी मैदानावर  होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील दसरा मेळाव्याचे ठिकाण जाहीर केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.

हेही वाचा >>>> विधानससभा निवडणुकीत किती जागा लढणार? रामदास आठवलेंनी थेट आकडाच सांगितला

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 
 
आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 
आणखी वाचा >>>> मोठी बातमी : प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक ; नेमकं काय आहे प्रकरण?
इतर बातम्या
Join Whatsapp Group