राज्यात मागील काही दिवसांपासून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे.
17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार असून या योजनेच्या अंतर्गत रिक्षा खरेदीची २० टक्के रक्कम ही सरकार देणार आहे. महिलांना रोजगार मिळावा या हेतूने सरकारने ही योजना आणली आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले की, "आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. "गुलाबी रिक्षा" असं या योजनेचं नाव असून या योजनेतून 20 टक्के रक्कम महिलेने भरायचे. तर २० टक्के सरकार तर ७० टक्के बँक लोन मधून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
काय आहे योजनेचे फायदे जाणून घ्या
महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रु. 80,000/- प्रदान करण्यात येतील.
जाणून घ्या काय आहे पात्रता
लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या कायम रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय लाभार्थी महिलांकडे वैध ड्रा यव्हिंग लायसन्स असावे लागते.
आवश्यक काय आहे कागदपत्रे
लाभार्थी महिलेकडे महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा, आधार कार्ड , चालक परवाना, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील आणि पासपोर्ट साइज फोटो असावा.