''या''  लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 4500 रुपये  जमा
''या'' लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 4500 रुपये जमा
img
दैनिक भ्रमर

राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे . या योजेनचा लाभ सर्व महिलांना मिळावा म्हणून राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. 

माझी लाडकी बहीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना थेट 4500 रुपयांचा लाभ मिळू शकतो. माझी लाडकी बहिन योजनेसाठी याआधी अॅप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते. पंरतू आता सरकारने ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी अंगनवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

दरम्यान , या  योजनेची मुदत आता 31 सप्टेंबर करण्यात आली आहे. ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठविण्यात आले असले तरी अजूनही अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल, किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group