लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले...
लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
राज्यसरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेवरून सुरुवातीपासूनच अनेक वाद विवाद झाले . या योजनेला जोरदार विरोधही करण्यात आला. ही  योजना बंद पडणार अशी टीका विरोधकांकडून करण्यात आला . परंतु यासोबतच या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे . तसेच ही योजना सुरु राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी जनतेला दिल आहे दरम्यान , आता लाडकी बहीण योजनेवरुन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निशाणा साधला आहे. राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. 

यावेळी, पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजना स्थार्थासाठी आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. लाडकी बहीणसारख्या योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर वाईट परिणाम होतील. स्वार्थासाठीच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नाहीत. जानेवारी महिन्यात राज्याची तिजोरी रिकामी होईल. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आधी रोजगार द्या. समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. शेतकऱ्यांची वीज मोफत मागितलेली नाही मग फुकट कशाला देता ?

तसेच , कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही जानेवारीत पैसे नसतील अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली. 2024-25 चं महाराष्ट्राचं बजेटनुसार राज्याचं महसुली उत्पन्न आहे, 4 लाख 98 हजार 758 कोटी आणि महसुली खर्च आहे 5 लाख 8 हजार 492 कोटी. सध्याच महसुली तूट आहे, 9 हजार 734 कोटींची. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि कर्जाच्या व्याजापोटी सरकारचा खर्चच होतो 53 टक्के. म्हणजेच 2 लाख 64 हजार 341 कोटी रुपये खर्च होतात आणि भांडवली तसंच इतर खर्च आहे 47 % म्हणजेच 2 लाख 34 हजार 416 कोटी रुपये. म्हणजेच पैसे जसे येतात तसे खर्च होत आहेत, उलट उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 47 हजार कोटी एवढा पैसा लागणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group