राज्यात सध्या चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विषयी मोठी बातमी समोर आली आहे . या योजने’ चा अनेक महिलांना लाभ झाला आहे. तर काही महिलांना अद्यापही योजनेची रक्कम मिळाली नाहीये . दरम्यान ह्या योजनेचा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.