लाडक्या बहिणीसाठी अर्ज भरणार्‍या
लाडक्या बहिणीसाठी अर्ज भरणार्‍या "त्या" पुरुषांना शासनाचा दणका; केली "ही" कारवाई
img
दैनिक भ्रमर

अकोला (भ्रमर वृत्तसेवा) :- ’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना मिळाला आहे. या योजनेची नोंदणी अद्यापही सुरूच आहे. मात्र, अकोल्यात या योजनेसाठी 6 पुरुषांनी अर्ज केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. 

या 6 जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केल्याचे तपासात आढळून आले आहे. या सहा जणांवर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ’लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता दि. 29 सप्टेंबर रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सहाही जण अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असून त्यांनी त्यांचे आधार कार्ड ’नारीशक्ती दूत’ अ‍ॅपवर अपलोड करून खोटी माहिती भरल्याचे दिसून आले. महिला व बालकल्याण विभाग, तसेच महानगरपालिका यांच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. या सहा जणांना खुलासा सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

लाडकी बहीण योजनेत खोटी माहिती देणार्‍या सहा जणांचे आधारकार्ड महिला आणि बालकल्याण विभागाने निलंबित केले आहे. या सहा पुरुषांना यापुढे त्यांच्या आधारकार्डद्वारे कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच त्यांच्याकडून या गैरप्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे, अशी माहिती अकोला जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group