राज्यातील बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट आली आहे . राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तर काही महिला अजूनही या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत अजूनही महिलांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे अशातच लाडक्या बहीण योजनेच्या नवीन अपडेट मुले महिलांमध्ये नाराजीचा सूर निर्माण आहे. कारण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज घेण्यास आता बंद करण्यात आले आहे. ज्यांना अर्ज भरता आलेले नाही त्यांना आता एकच पर्याय ठेवण्यात आला आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 होती. पण नंतर ती वाढवण्यात आली आहे. ‘नारी शक्ति दूत’ या ॲपमधून योजनेसाठी आधी अर्ज करत येत होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जात होते. पण आता ते बंद झाले आहे. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातील अॅपद्वारे अर्ज भरताना देखील तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यानंतर सरकारने www.ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली. नारी शक्ति दूत ॲपमध्ये फॉर्म भरताना “NO NEW FORM ACCEPTED “ असा मेसेज येत आहे. तर ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडी सेविका यांना संपर्क करण्याचा मेसेज येत आहे.
दरम्यान , ऑनलाइन पद्धतीने आणि नारी शक्ति दूत ॲपद्वारे अर्ज घेणे सुरु केल्याने त्याचा फायदा अनेक महिलांना घेता आला पण आता दोन्ही पद्धतीने अर्ज बंद झाल्याने महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील आहे. सरकारने www. ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईटच्या माध्यामातून पुन्हा अर्ज घ्यावे अशी मागणी महिला करत आहेत.
राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांनाय या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी काही अटी देखील आहेत. त्यामुळे अर्ज भरताना त्या आधी वाचून घ्याव्यात. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.