४ जुलै २०२४
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत.
त्यामुळे खरेच योजना किती महत्वाची आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. या योजनेमध्ये भष्ट्राचार होऊ नये, ही अपेक्षा आहे. या योजनेचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे डेटा होता म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना चांगली राबवली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Copyright ©2024 Bhramar