ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार योजनेचा लाभ ? वाचा सविस्तर
ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार योजनेचा लाभ ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
सध्या सर्वाधिक चर्चा असलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षा बंधनापूर्वी अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल. पण ज्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला त्यांचे काय? त्यांच्या अर्जांना अजून मंजूरीचा संदेश प्राप्त झालेला नाही. त्या बहिणी चिंतीत आहेत. त्यांच्या हफ्त्याचे काय त्यांना केव्हा मिळणार पैसे अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचे निवारण केले आहे . 

 त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या लाडक्या बहि‍णींना आता एकदाच तीन महिन्यांचा माहेरचा आहेर भेटणार आहे. या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत. रक्षाबंधना पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या बहि‍णींच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

महायुती सरकारने आज पुण्यातील बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या योजनेवरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group