लाडक्या बहिणींनी  केली नाशिकरोड मधील बँका मध्ये गर्दी....
लाडक्या बहिणींनी केली नाशिकरोड मधील बँका मध्ये गर्दी....
img
Chandrakant Barve
नाशिकरोड(भ्रमर प्रतिनिधी):- लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी व चौकशी करण्यासाठी लाडक्या बहिणी नाशिकरोड मधील विविध बँकेत गर्दी केली. यामुळे बँक कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढलेला दिसून आला. राज्य सरकार ने मागील काही दिवसा पासून राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली. निवडणुकीच्या परश्याभूमीवर जाहीर झालेल्या या योजना मुळे विरोधकांनी सरकार ला धारेवर धरले होते.

मात्र महिला वर्गाने मोठ्या प्रमाणत ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे काही दिवस अगोदर सायबर केंद्र व सेतू केंद्रवर महिलांनी गर्दी केली होती. सरकार ने महिलांना चा उत्सह पाहून या योजनेतील किचकट मागण्या शिथिल केल्या, त्यामुळे महिलांचा उत्सह वाढला होता.

स्वतंत्रदिन व रक्षाबंधन काळात बँकेत पैसे जमा होतील असे सरकार ने जाहीर केल्याने काल स्वतंत्रदिन सुट्टी संपल्या नंतर आज सकाळी नाशिकरोड मधील स्टेटबँक, युनियन बँक, व्यापारी बँक, महाराष्ट्र बँक तसेच अनेक बँकेत महिलांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. त्यात आज बांगलादेश मध्ये हिंदुवर झालेल्या अन्याय विरोधात नाशिक जिल्हा बंद ची हाक दिली होती.

सकाळ पासून शहर सर्व बंद होते. मात्र सरकारी बँका चालू असल्याने महिलांनी बँकेत जाण्या येण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या दैनंदिन कामा सोबत हे काम वाढल्याने त्यांचे काम करीत असताना कंबरडे मोडले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group