''या'' दिवशी होणार लाडकी बहीणचे पैसे खात्यात जमा, मंत्री अदिती तटकरेंनी जाहीर केली तारीख
''या'' दिवशी होणार लाडकी बहीणचे पैसे खात्यात जमा, मंत्री अदिती तटकरेंनी जाहीर केली तारीख
img
दैनिक भ्रमर
सर्वाधिक  चर्चेत असलेल्या  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील हजारो महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. आता या योजनेचे पैसे खात्यात केव्हा येणार याची उत्सूकता सर्वत्र बघायला  मिळतेय आहे. त्याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी परभणी येथील महिला मेळाव्यात बोलताना  दिलेय .

यावेळी  मंत्री अदिती तटकरे  म्हणाल्या की, विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी राज्यातील कोट्यवधी महिलांना योजनेचे दोन हप्ते याच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांनी महायुतीच्या मागे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांना टोला लगावत अदिती तटकरे म्हणाल्या की विरोधक हे सर्वाधिक फॉर्म भरुन घेत आहेत, आणि योजनेला विरोधही करत आहेत.

महिला मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, विरोधक योजनेबद्दल अपप्रचार करत आहेत. निवडणुकीनंतर योजना बंद होणार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी कितीही अपप्रचार केला तरी योजनेचा लाभ कायम सुरु राहाणार आहे, असे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले.

अदिती तटकरे म्हणाल्या की, अर्जांची शेवटची छाननी सुरु आहे. 16 आणि 17 ऑगस्टला कोट्यवधी बहिणींच्या णीं बँक खात्यात थेट रक्कम पोहचवण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यासाठी सर्व अडचणी दूर केल्या जातआहेत. तांत्रिक पडताळणीही केली जात आहे. तांत्रिक पडताळणीसाठी महिलांच्या बँक खात्यात त्यासाठी एक रुपया जमा करण्यात आला आहे. त्याबद्दल कोणताही गैरसमज करुन घेऊ नका. अपप्रचाराला बळी पडू नका,असे आवाहन तटकरेंनी केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group