“१५०० रुपयांत महिलांची मतं विकत घेण्यासाठी..” रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची जोरदार टीका
“१५०० रुपयांत महिलांची मतं विकत घेण्यासाठी..” रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची जोरदार टीका
img
दैनिक भ्रमर
सध्या राज्यभरात माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे . याच दरम्यान १६ ऑगस्ट रोजीपासून या योजनेचे पॆसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे . त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . पण त्याचबरोबर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत . दरम्यान , लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आली आहे. कारण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० तर काहींना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये देऊ. सोबतच यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. तर, पुढील पाच वर्षांसाठी ही योजना निश्चित सुरू असेल, महिला भगिनींना ५ वर्षांचे ९० हजार रुपये मिळतील, असा शब्द अजित पवार यांनी पुण्यातल्या बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधीच यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीने अशी घोषणा केल्याने ते आता म्हणालेत. मात्र ते फक्त सत्तेत परत येण्याची भाषा करीत आहेत. नेहमी मतांचीच भाषा महायुतीचे नेते करत आहेत. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे दुसरे तिसरे काहीही नाही. पंधराशे रुपयात महिलांची मतं विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group