जन सन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचं नवं गाण लाँच; पाहा VIDEO
जन सन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचं नवं गाण लाँच; पाहा VIDEO
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरामध्ये जन्मसन्मान यात्रा काढली. नाशिकमधून या जन सन्मान यात्रेला सुरूवात झाली असून याठिकाणावरून अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले.

या जन्मसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीप्रदर्शन करणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन गाणं लाँच केले आहे. या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

'गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी!', असं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या गाण्याचे नाव आहे. 'काम करत आलोय, काम करत राहू.', अशी नवी टँगलाईन वापरून हे गाणं तयार करण्यात आले आहे.

अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या नव्या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांनी 'गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी! आलंय राष्ट्रवादीचं नवं गाणं!', असे लिहिले आहे. या गाण्यामध्ये अजित पवार गटाचे सर्व नेते, त्यांच्या बैठका-सभा, नव्या प्रकल्पांचे उद्घाटन, नव्या घोषणा, केलेली कामं, लाडकी बहीण योजना या सर्व गोष्टींची झलक पाहायला मिळत आहे.


जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे. या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार गटाचे सर्व नेते देखील सहभागी झाले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group