अमेरिकन आयडॉल सीझन 5 फेम आणि ग्रॅमी विजेती गायिका मंडिसाचा मृत्यू झाला आहे. तिच्या निधनानं तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंडिसाच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या मृत्यूची दु:खद बातमी माहिती देण्यात आली आहे. 47 वर्षीय मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात सापडला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.
मंडिसाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "आम्ही तुम्हाला माहिती देतो की, काल मंडिसा तिच्या घरी मृतावस्थेत सापडली होती. आम्हालाला तिच्या मृत्यूचे कारण माहित नाही. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्र मंडळासाठी तुम्ही प्रार्थना करावी, अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. मंडिसा ही जगभरातील आव्हानांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी प्रोत्साहन आणि सत्याचा आवाज होती." या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मंडिसाला श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण आहे गायिका मंडिसा ?
मंडिसाचे पूर्ण नाव मंडिसा लिन हंडली असं आहे. तिने 2006 मध्ये अमेरिकन आयडॉलमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे मंडिसाला विशेष लोकप्रियता मिळाली. अमेरिकन आयडॉल नंतर, 2007 मध्ये मंडिसाचा ट्रू ब्युटी नावाचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. मंडिसाने अनेक हिट गाणी गायली.
मंडिसाला सर्वोत्कृष्ट समकालीन ख्रिश्चन म्युझिक अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तिला ओव्हरकॉमर अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता.
मंडिसाचे अल्बम्स
मंडिसाने 'फ्रीडम', 'इट्स ख्रिसमस', 'व्हॉट इफ वुई रीअल,' 'आउट ऑफ द डार्क' आणि 'ओव्हरकमर' यासह अनेक अल्बम रिलीज केले.