प्रेक्षकांसाठी खुशखबर.... मिर्झापूरच्या चौथ्या सीझन मध्ये
प्रेक्षकांसाठी खुशखबर.... मिर्झापूरच्या चौथ्या सीझन मध्ये "हा" अभिनेता करणार कमबॅक ?
img
Jayshri Rajesh
ओटीटीवरी बहुप्रतिक्षित वेब सीरीज मिर्झापूर 3 काही दिवसांपूर्वीत प्रदर्शित झाली आहे. मिर्झापूर 3 सीरिजवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. चाहत्यांना या सीझनपासून खूप अपेक्षा होत्या, मात्र अनेक चाहत्यांच्या या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. मिर्झापूर वेब सीरीजचे पहिले दोन सीझन फॅन्सना खूप आवडले होते. आता मिर्झापूर 3 मध्ये चाहते मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदू शर्मा याला खूप मीस करत आहेत. यामुळे आता प्रेक्षकांच्या नजरा मिर्झापूर 4 कडे लागल्या आहेत. 

चौथा सीझन येणार?

चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या मिर्झापूरच्या या सीझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांना ही सीरीज आवडली आहे, तर  काही प्रेक्षकांच्या मते, मागील दोन सीझनच्या तुलनेत तिसरा सीझन खास नाही. पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या दमदार भूमिका असूनही, ज्यांनी मिर्झापूर 3 पाहिला आहे त्यांना आता चौथ्या सीझनची वाट पाहावी लागणार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

 मुन्ना भैय्या करणार कमबॅक ?

मिर्झापूर सीझन 3 सध्या ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रिमिंग होत आहे. मिर्झापूर सीझन 3 पाहिल्यानंतर चाहते चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर सीझन 4 च्या संभाव्य चर्चांना आता उधाण आलं आहे. मिर्झापूर 3 पाहिल्यानंतर चाहते मिर्झापूरच्या पुढील सीझन चर्चा सुरु झाली आहे. चौथ्या सीझनमध्ये चाहत्यांना मुन्ना भैय्याला पाहायची इच्छा आहे. निर्मात्यांकडून अद्याप मिर्झापूर सीझन 4 ची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

मिर्झापूरचा पहिला सीझनचा 16 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर मिर्झापूरचा दुसरा सीझन 23 ऑक्टोबर 2020 रोजी आणि आताचा मिर्झापूरचा तिसरा सीझन 5 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झाला. मिर्झापूर सीझन 4  2026 किंवा 2027 पर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group