लोकसभा निवडणुकीत आयुष्यमान खुरानाला मिळाली मोठी जबाबदारी , व्हिडीओ आला समोर
लोकसभा निवडणुकीत आयुष्यमान खुरानाला मिळाली मोठी जबाबदारी , व्हिडीओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. आयुष्यमान खुराना अनेकदा सामाजिक मुद्यावरही भाष्य करतो. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुष्यमानला मोठी जबाबदारी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाला युथ आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. आता आयुष्यमान खुराना आता नागरिकांना, तरुणांना मतदानासाठी आवाहन करणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाचा व्हिडीओ रिलीज केला. या व्हिडिओमध्ये यूथ आयकॉन आयुष्मान खुराना लोकांना मतदानासाठी आवाहन करताना दिसत आहे.

आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी आणि संवेदनशील करण्यासाठी आयुष्मान खुराना यांची निवड भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. या मोहिमेद्वारे आयुष्मान आपल्या देशातील तरुणांना विनंती करेल की त्यांनी पुढे येऊन संसदेत आपल्या देशाचे पुढचे नेते निवडण्यासाठी आपला हक्क बजावावा.


मतदान का करावे? आयुष्यमानने सांगितले कारण...
या व्हिडिओमध्ये आयुष्मान मतदान न करण्याच्या अनेक कारणांची चर्चा करताना दिसत आहे. एक मतही दिले नाही तर काय होईल, असे लोकांना वाटते. 'मतदान न करण्यासाठी 101 कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे आपली जबाबदारी, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.' असे आयुष्यमान खुराना सांगताना दिसत आहे. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group