मृणाल दुसानिस पुन्हा मनोरंजनसृष्टीत करणार कमबॅक? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा
मृणाल दुसानिस पुन्हा मनोरंजनसृष्टीत करणार कमबॅक? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा
img
Dipali Ghadwaje
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मृणाल भारतात परतली. चार वर्षांनंतर अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांंसह भारतात आली आहे. यासंबंधित तिने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून चाहते तिला पुन्हा मालिकेत किंवा चित्रपटातून पाहायला मिळणार का? असे अनेक प्रश्न विचारत आहेत. आता यावर मृणालने स्वतः उत्तर दिलं आहे.

2018 साली आलेली 'हे मन बावरे' ही तिची शेवटची मालिका. ही मालिका संपेपर्यंत ती लग्न करुन अमेरिकेला स्थायिक झाली. तिने नुर्वी या गोंडस मुलीला जन्म दिला. आता मृणाल पती आणि लेकीसह तब्बल ४ वर्षांनी भारतात आली आहे.

नाशिकमधील गोदाकाठ येथे सेल्फी शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली. आता पुढील प्लॅनविषयी एका वृत्त संस्थेशी बोलताना ती म्हणाली, "इतक्या वर्षांनी पुन्हा मायदेशी परतल्यानंतर खूप आनंद होतोय. आता मी भारतातच राहणार आहे. माजी मुलगी नूर्वी दीडच वर्षांची आहे. ती तर पहिल्यांदाच भारतात आली आहे. माझी जन्मभूमी नाशिकमध्ये लेकीला फिरवताना मला खूप मजा आली. नूर्वीला पाणी बघायला खूप आवडतं. म्हणून आम्ही छान नदीकाठी बसलो, फोटो काढले." 

पुन्हा काम सुरु करणार का? याविषयी बोलताना ती म्हणाली, "नक्कीच मला पुन्हा काम करायचं आहे. चाहते तर मला सतत परत कधी पडद्यावर दिसणार असं विचारत असतात. मी चांगली संधी शोधत आहे. मला सिनेमाही करायचा आहे. नाटकही करायला आवडेल. प्रायोगिक नाटकं तर मी केलीच आहेत आता व्यावयायिक नाटक करायचं आहे."

दरम्यान, २०१६ साली मृणालने नीरज मोरे याच्याशी लग्नगाठ बांधली. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो अमेरिकेत राहतो. त्यामुळे लग्नानंतर मृणालने काही वर्षांसाठी मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेतला. पण तिने २०१८मध्ये ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून कमबॅक केलं. त्यानंतर २४ मार्च २०२२मध्ये मृणालला मुलगी झाली. तेव्हापासून ती मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. त्यामुळे मृणालच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group