ठाकरे गटाच्या नेत्याचा , देवेंद्र फडणवीस यांना इशारा ; म्हणाले 'या नित्या राणेचा......'
ठाकरे गटाच्या नेत्याचा , देवेंद्र फडणवीस यांना इशारा ; म्हणाले 'या नित्या राणेचा......'
img
Dipali Ghadwaje
भाजपाचे आमदार नितेश राणे प्रक्षोभक वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल, तर मशिदीत घुसून चून चून के मारेंगे असा इशारा नितेश राणे यांनी दिला. त्यानंतर मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा केला. नितेश राणे हे त्यांचं वक्तव्य आणि कृतीमुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आमदार नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे.

“मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा करतोस, मात्र राज्यातील जनता तुझे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही” असं शरद कोळी म्हणाले. “नितेश राणे आणि त्याचा बाप दलाल असून स्वतःला गब्बर म्हणतोय. गब्बर हा लोकांवर अन्याय करणारा, लोकांच्या घरावर दरोडे टाकणारा होता त्यामुळे तू देखील जातीयवादी औलाद असून महाराष्ट्रावर दरोडा टाकतोय” असं शरद कोळी म्हणाले.

“महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तू दलाली घेतली आहेस. मराठा, मुस्लिम, ओबीसी विरोधात बोलून युवकांची माथी भडकवून राज्यात दंगल घडवण्याची दलाली घेतली आहेस. नित्या दलाली करायचे बंद कर अन्यथा गब्बरची जशी हालत झाली तशी तुझी होणार आहे” असं शरद कोळी म्हणाले. “देवेंद्र फडणवीस या नित्या राणेचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचं सरकार आल्यावर त्याची काय अवस्था केली जाईल ते बघा” असा इशारा शरद कोळी यांनी दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group