देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांवर मोठं वक्तव्य ! म्हणाले, लोकसभा निवडणूक हरलो...
देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांवर मोठं वक्तव्य ! म्हणाले, लोकसभा निवडणूक हरलो...
img
दैनिक भ्रमर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर भाजपकडून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अजित पवार यांच्यामुळेच लोकसभा निवडणूक हरलो, असे वक्तव्य भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार यांच्यामुळेच लोकसभा निवडणूक हरलो, 
दरम्यान , आगामी विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

एका टीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकसभेच्या 12 जागा होत्या ज्या आम्ही 3 ते 6 हजार मतांनी गमावल्या. एकूण मतांमधील तफावत पाहिल्यास महाविकास आघाडीच्या तुलनेत केवळ 2 लाख कमी मते मिळाली आहेत. कारण, अजित पवारांची मते आमच्याकडे हस्तांतरित झाली नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली मते आमच्या बाजूने सहज हस्तांतरित केली, पण अजित पवारांचे मत आम्हाला मिळू शकले नाही. राष्ट्रवादीची मते मिळाली असती तर आमचा पराभव झाला नसता. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, भाजपला अजित पवारांची युती सोयीची नव्हती, पण आता परिस्थिती सुधारली आहे. युती आवश्यक आहे हे सर्वांना माहीत आहे आणि भविष्यात आम्ही एकत्र काम करू, असा दावाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला महाराष्ट्रात 17 जागांवर विजय मिळवता आला. 17 पैकी भाजपने 9, शिंदे गट शिवसेनेने 7 आणि राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला. 28 जागांवर लढून भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या. तसेच शिवसेनेने (शिंदे गट) 15 जागा लढवून केवळ 7 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 4 जागा लढवल्या. परंतु, अजित पवार गटाला केवळ एका जागेवर आपला झेंडा रोवता आला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group