राज्याच्या राजकारणातून एक मोतिबातमी समोर आली आहे. महायुतीतील घटक पक्षातील नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठी विधानं केली आहेत. मराठा आरक्षणासह विविध विषयावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
भाजपचे काही प्रस्थापित लोकंच देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेशी सहमत नाहीत. तर अजित पवार हे सुद्धा एक प्रस्थापित नेते असून त्यांची आणि आमची पंगत वेगळी असल्याचे विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ‘अजित पवार हे महायुतीत आले पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळे आमची पंगत जरा वेगळी आहे. आम्ही विस्थापितांच्या बाजूने आहोत, अजित पवार जरा प्रस्थापितांच्या बाजूने आहेत.
भाजपमधील काही प्रस्थापित नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा देत नाहीत. भाजपमधील अनेक प्रस्थापित नेते हे भित्रे आणि गुळमुळीत बोलणारे आहेत. फडणवीसांच्या भूमिकेवर भाजपातून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि मीच बोलत असतो’, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्टच म्हटलं.