विधानसभा निवडणूक : अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा , उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
विधानसभा निवडणूक : अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा , उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. 

अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.

17 जणांना एबी फॉर्मचं वाटप

  1. राजेश विटेकर 
  2. संजय बनसोडे
  3. चेतन तुपे
  4. सुनील टिंगरे
  5. दिलीप वळसे पाटील
  6. दौलत दरोडा
  7. राजेश पाटील
  8. दत्तात्रय भरणे
  9. आशुतोष काळे
  10. हिरामण खोसकर 
  11. ⁠नरहरी झिरवळ
  12. ⁠छगन भुजबळ
  13. ⁠भरत गावित 
  14. ⁠बाबासाहेब पाटील
  15. ⁠अतुल बेनके
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group