अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली ! पण १५ दिवसांतच आमदाराने घेतला तुतारी फुंकण्याचा निर्णय
अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली ! पण १५ दिवसांतच आमदाराने घेतला तुतारी फुंकण्याचा निर्णय
img
दैनिक भ्रमर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकारणात घडामोडींना वेग आला असून, अजित पवारांच्या गटातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे बाळ वाढताना दिसत आहे. दरम्यान आता अजित पवार गटाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी ही  आता तुतारी फुंकण्याचा निर्णय घटेल आहे. दादांकडे आमच्या आजाराचं औषध नाहीये, अशा शब्दात पक्ष सोडण्याचे कारण फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले. आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.

दरम्यान , दीपक चव्हाण यांच्या मनात पक्षबदलाविषयी चलबिचल सुरू होती. हेच हेरून अजित पवार यांनी थेट फोनवरून जनतेसमोर दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु उमेदवारी जाहीर केल्याच्या १५ दिवसांतच त्यांनी मनगटावरील घड्याळ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला.

दीपक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी पक्षात कार्यकर्ता म्हणुन काम करतोय. पक्षाने मला २००९ ला फलटणमधून लढण्याची संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत फलटणचे प्रतिनिधित्व करतो आहे. मधल्या काळात जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा कुणाकडे जायचे हे धर्मसंकट आमच्यासमोर होते. तेव्हा आम्ही अजित पवारांसोबत गेलो. लोकांच्या विकासाच्या मागण्या होत्या. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रामराजेंच्या निर्णयामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. मात्र इथले स्थानिक भाजप नेतृत्व आणि आमच्यात प्रचंड मतभेद आहेत. राज्याच्या भाजप वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना ताकद मिळत आहे. त्याचा वापर करून स्थानिक नेतृत्व आमच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत आहेत. आमच्या या दुखण्यावर अजित पवार काहीच करु शकले नाहीत, असे दीपक चव्हाण म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group