शरद पवारांना मोठा धक्का ? ''हा'' बडा नेता भाजपच्या संपर्कात
शरद पवारांना मोठा धक्का ? ''हा'' बडा नेता भाजपच्या संपर्कात
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून विधानसभा निवडणुकीत महाविकस आघाडीला खूप मोठा धक्का सहन करावा लागला. यांनतर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे. शरद पवार गटातील बडा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे भाजपच्या संपर्कात आहेत. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश माहजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यसाठी इच्छूक होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. अजित पवार गटात प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं की, देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाहीये.  देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही? याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजत असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता  देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात, भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group