अजित पवारांना मोठा धक्का, दोन आमदार लवकरच करणार रामराम? वाचा
अजित पवारांना मोठा धक्का, दोन आमदार लवकरच करणार रामराम? वाचा
img
Dipali Ghadwaje
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल आणि निकालाची घोषणा होईल.

अशातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे दोन आमदार सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांना दोन मोठे धक्के

अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा रणजितसिंह निवडणूक लढवेल असे सांगितले आहे. विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी मुलासाठी शरद पवार गटाकडे तिकीटाची मागणी केल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना दोन मोठे धक्के बसणार आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group