"......तर शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा"- प्रकाश आंबेडकर
img
Dipali Ghadwaje
परभणी :   राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार  गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आहे. दरम्यान गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुनज विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार ,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर /

प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत.  परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य  केले आहे.  तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणून देखील  संबोधले आहे.  प्रकश आंबेडकर म्हणाले,  मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्ही तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा... 

 जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आणि अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.  
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group