काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप ;  म्हणाले....
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप ; म्हणाले....
img
DB
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडल्याचे चव्हाण म्हणाले.

लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.

मधुकरराव चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळावा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहीत पदाचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा दिला राजीनामा दिला होता.   
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group