पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान आता या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीनुसार ममता बॅनर्जी याना मोठा झटका मिळाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे.
58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाली आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. 58 आमदारांचा गट हा तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव केला.
दरम्यान, तब्बल 58 आमदाराचा गट तृणमूलमधून बाहेर पडला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आमदाराच्या गटानं बंडखोरी केली आहे, त्यानंतर या 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देखील मिळाली आहे.