देशभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. पुणे मुंबई, बंगळुरु, आग्र्यासह सर्व नटखट बाळ कृष्ण सजले आहेत. जन्माष्टमीचा शुभ सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. मथुरा आणि वृंदावन भगवान कृष्णाचा जन्म सोहळा रंगला आहे.
दरम्यान मागाठाणे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे.
त्याशिवाय या ठिकाणी काही कलाकार देखील उपस्थित राहणार आहे. अभिनेता सुनिल शेट्टी, चंकी पांडेसह अनेक बॅालिवुड स्टार, अवधुत गुप्ते आणि मराठी सिने सृष्टीमधील कलाकार गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी येणार आहे.