धक्कादायक घटना : पोलीस हवालदाराच्या मुलाची वडिलांच्याच सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडत आत्महत्या
धक्कादायक घटना : पोलीस हवालदाराच्या मुलाची वडिलांच्याच सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडत आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
मुंबई पोलीस दलातील एका हवालदारच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने  वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हर्ष 20 वर्षांचा होता. त्याने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. 

हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे SP युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून काम करतात. संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हर्षने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.  आत्महत्या करण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. 

संतोष म्हस्के हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी त्यांच्या युनिटमध्ये तैनात होते, अशी माहिती समोर येत आहे.

सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले आहे. ते या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group