हृदयद्रावक...! आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, अन् मग नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल
हृदयद्रावक...! आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, अन् मग नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल
img
Dipali Ghadwaje
पंढरपुरातून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , घरगुती वादातून आसबे कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं. आधी पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नंतर पतीने घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय प्रकरण ?

४ जुलै रोजी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे आणि पती म्हमाजी आसबे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. वाद टोकाला गेला. यानंतर पत्नीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी मोनाली म्हमाजी आसबे आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह गावातील विहिरीजवळ गेल्या.

नंतर मोनालीने आपल्या मुलांसह आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी आत्महत्या केल्यामुळे पतीला मानसिक धक्का बसला. त्यानं ५ जुलै रोजी सकाळी गळफास घेत स्वतःला संपवलं. या घटनेने एकाच घरातील चार जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. राग आणि वादामुळे एका कुटुंबाचा अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव हादरलं आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group