सिडकोतील दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारु दुकानाबाहेर दारुच्या नशेत एका इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकुन खुन झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
उंटवाडी परिसरातील गणपत घारे (वय ५०) असे मयताचे नाव आहे. गणपत घारे आणि आरोपी सरमोद रामविश्वास कौर (वय ३५) हे दोघेही देशी दारु दुकानासमोर दारू पित बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादात सरमोद कौर याने लाकडी दांडक्याने गणपत घारे यांच्या डोक्यात जबर मार केला.
या मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दारूच्या नशेत हा खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.